Juni Vihir Durusti Yojana Maharashtra 2023

Vihir Duruti Yojana Maharashtra 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची जुनी विहीर पडलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांना ती जुनी विहीर दुरुस्त करायची असते. पण दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येत असतो, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी खूप अडचणी येतात. अशा वेळी खचून न जाता शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा फायदा घेतला पाहिजे. शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला  Vihir Duruti Yojana Maharashtra 2023 या बद्दल सांगणार आहे ज्यामधून तुम्हाला जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी सरकार कडून जवळपास ५० हजार रुपये अनुदान  दिले जातात. 




Vihir Duruti Yojana Maharashtra 2023

सरकारच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या अनेक साऱ्या योजना असतात. पण सर्वसाधारण शेतकऱ्यांना त्या योजनेची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना अशा योजनेचा लाभ घेता येत नाही. आणि अशाच पैकी एक योजना आहे, ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी जवळपास अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते व तसेच या योजनेअंतर्गत अजून देखील काही फायदे आहेत याची माहिती पुढे पाहूयात 


जुनी विहीर दुरुस्ती अनुदान योजना महाराष्ट्र 2023 

शेतकरी मित्रांनो जुनी विहीर पडलेली असेल किंवा तुम्हाला त्या जुन्या विहिरीला दुरुस्त म्हणजेच तिला बांधायचे असेल तर मित्रांनो त्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च येतो पण मित्रांनो तुम्ही सरकारी योजनेमध्ये अर्ज केला तर तुम्हाला सरकार जवळपास 50 हजार रुपये हे जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी देत आहे त्यासाठी तुम्ही या योजनेमध्ये नक्की अर्ज केला पाहिजे तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 


जुनी विहीर दुरुस्ती योजनेमध्ये अर्ज कसा करावा?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेमधून नवीन विहीर घ्यायचे असेल किंवा तुमची जुनी विहीर दुरुस्त करायचे असेल तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी Mahadbt farmer पोर्टल वरती जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना शोधून यामध्ये अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही CSC सेंटरवर जाऊन देखिल अर्ज करु शकता. 


जुनी विहीर दुरुस्तीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला 'Vihir Duruti Yojana Maharashtra 2023'  जुनी विहीर दुरुस्ती करायची आहे त्यासाठी पन्नास हजार रुपये शासन देते हे देखील माहित आहे पण या योजनेमध्ये नेमके कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो सदर योजना ही फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी आहे त्यामुळे तुम्ही जर या प्रवर्गातील असाल तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये नक्की अर्ज करू शकता.

शेतकरी मित्रांनो जूनी विहीर दुरुस्ती संदर्भात जास्त माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇