पिक विमा 2022

 

पिक विमा 2022 

नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टी व जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पाठीमागे ून महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये तसेच जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील खूप सार्‍या भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे खूप सारे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा समावेश होता त्याचप्रमाणे सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली की त्या अतिवृष्टीमुळे जवळपास महाराष्ट्रातील सर्वच्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्यामुळेच शेतकरी हे खूप चिंताग्रस्त झाले होते कारण त्यांचं जे पण काही वार्षिक उत्पन्न असतं तर याच पिकांवर ते असतं त्यांचा उदरनिर्वाह याच शेतीतून असलेल्या उत्पन्नावर असतो आणि तेच उत्पन्न त्यांच्या हातातून त्यांच्या डोळ्यासमोरून जात होते आणि त्या उद्देशाने अनेक सारे महाराष्ट्रामधील भागांमध्ये शेतकऱ्यांमार्फत आंदोलन केले जात होते आणि खरं सांगायला गेलं तर त्यांची बाजू खरीच होते कारण पिक विमा कंपनी हे मान्य करत नव्हते की शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळेच आतापर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळालेला नाही 


पिक विमा कधी मिळणार 

एवढं नुकसान होऊन सुद्धा पिक विमा कंपन्या सांगत होत्या की या भागांमध्ये नुकसान झालं नाही त्या भागामध्ये नुकसान झालं नाही आणि त्यामुळेच आपल्या राज्याचे कृषिमंत्री माननीय अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या पिक विमा कंपन्यांचे अधिकारी होते त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी होते त्यांच्यामध्ये सविस्तरपणे चर्चा झाली त्यानंतर कृषिमंत्र्यांनी कंपन्यांना जाब पणे विचारले की पिक विमा शेतकऱ्यांना का मिळत नाही व पिक विमा मध्ये क्लीन केलेली शेतकरी तुम्ही अपात्र का करतात तर याचे उत्तर देताना कंपनीने सांगितले की जवळपास सर्वच शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरविण्यात येत आहेत फक्त 51 लाखांपैकी एक लाख 85000 च्या आसपास शेतकरी याच्यामध्ये प्रलंबित ठेवलेले आहेत आणि त्या पाठीमागचे कारण आहे की शेतकऱ्यांनी दोन वेळेस आपल्या पिकाचा प्लॅन केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायला वेळ लागतोय पण या सुद्धा शेतकऱ्यांना लवकरात लवकर एक्सेप्ट केल्या जाईल अशा प्रकारचे उत्तर पिक विमा कंपन्यांकडून दिले गेलेला आहे




या दिवशी मिळणार पिक विमा



त्यामुळे आपल्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी असे सांगितलेले आहे की येत्या आठ दिवसाच्या आत मध्ये जवळपास सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचा क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना हे पिक विम्याचे पैसे मिळणार आहेत मग तो प्लॅन ऑनलाइन पद्धतीने असेल किंवा ऑफलाइन पद्धतीने असेल परंतु आपल्या पिकाच्या नुकसानीचा क्लेम केलेला असला पाहिजे