Vihir Anudan Yojana Maharashtra 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला पाण्याचा सहारा घ्यावा लागतो आणि त्यासाठी अनेक सारे शेतकरी बोरचा, शेततळ्याचा, तर काही शेतकरी विहिरीचा उपयोग करतात पण जास्त प्रमाणात तर महाराष्ट्रामध्ये विहिरीचाच उपयोग केला जातो तर मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये विहीर अनुदानासाठी असणाऱ्या vihir anudan yojana Maharashtra 2023 सरकारी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पण विहीर पाडायची असेल तर सरकारी योजनेमध्ये नक्की अर्ज करा आणि ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा
विहीर घेण्यासाठी बेस्ट 3 सरकारी योजना
तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात विहीर पाडण्यासाठी अनेक योजना आहेत पण महत्त्वाच्या तीन योजना आहेत आणि मग तुम्ही नेमक्या कोणत्या योजनेअंतर्गत अर्ज केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्त अनुदान मिळेल तर याचीच माहिती जाणून घेऊयात
⭕ नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना
मित्रांनो विहीर पाडण्यासाठी पहिले योजना आहे ती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध मशीन व वस्तू घेण्यासाठी सरकारतर्फे अनुदान दिले जाते याच्यामध्ये विहीर असेल शेडनेट असेल पाण्याची मोटर असेल अशा प्रकारच्या अनेक साऱ्या वस्तू दिल्या जातात तर मित्रांनो विहिरीसाठी या योजनेअंतर्गत जवळपास अडीच लाख रुपये एवढे अनुदान दिले जाते तरी यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्र लागतात पण याचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता त्यामुळे तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधने किंवा कोणाची सही घेणे यांची काहीही गरज पडत नाही डायरेक्ट तुम्ही अर्ज करू शकता व मंजुरी मिळाल्याच्या नंतर विहीर घेतल्यानंतर तुमच्या अकाउंट वर पैसे क्रेडिट केले जातात
⭕ डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये विहीर घेण्यासाठी दुसरी योजना आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन विहीर घेण्यासाठी जवळपास अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते समजा तुमची जुनी विहीर असेल आणि तिला दुरुस्त करायचे असेल तर त्यासाठी पन्नास हजार रुपये दिले जाते पण याच्यामध्ये एक अट आहे ती म्हणजे ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी आहे त्यामुळे तुम्ही या प्रवर्गातील असाल तर यामध्ये नक्की अर्ज करू शकता याच्यामधला प्लस पॉईंट हा आहे तो म्हणजे याचा अर्थ आपण mahadbt फार्मर पोर्टल वरून मोबाईल वरून देखील करू शकतो
⭕ महात्मा गांधी रोजगार हमी योजना
मित्रांनो यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये विहीर घेण्यासाठी तिसरी आणि महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत जर तुम्ही विहीर घेण्यासाठी अर्ज केला तर तुम्हाला चार लाख रुपये अनुदान दिले जाते त्यामुळे बरेच शेतकरी विहिरीसाठी अनुदान जास्त असल्यामुळे या योजनेमध्ये अर्ज करतात पण या योजनेमध्ये आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्यामुळे आपल्याला ग्रामसेवकांशी तलाठ्यांशी वेळोवेळी विचारपूस करावी लागते की आमचा अर्ज मंजूर झाला का कधी पैसे मिळतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे पैसे घेण्यासाठी आपल्याला जवळपास दहा ते पंधरा आपल्या गावातील पासबुक गोळा करावे लागतात आणि त्याच पासबुक वर हे पैसे डिव्हाईड करून येतात त्यामुळे तुम्हाला हे तुमच्या जवळचे पासबुक घेणे गरजेचे आहे
तर मित्रांनो तुम्हाला जर 2023 मध्ये खरोखर सरकारी योजनेमध्ये अर्ज करून विहीर पाडायची असेल तर वर दिलेल्या या तीन योजना आहेत ज्याच्या अंतर्गत तुम्हाला दोन योजनेंमध्ये अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते व एका योजना अंतर्गत तुम्हाला चार लाख रुपये अनुदान दिले जाते तर बघा आता तुम्हीच ठरवू शकता की तुम्हाला चार लाख रुपये अनुदान घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे का ऑनलाईन अर्ज करून अ
0 Comments