Free silai machine yojna


Free silai machine yojna 











नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये खूप सारे नागरिक हे दारिद्र्यरेषेखाली आहेत त्याचप्रमाणे खूप सारे नागरिक गोरगरीब आहे त्यांना रोजगार नाहीये त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जगत असताना खुप सार्‍या अडचणींचा सामना करावा लागतोय त्याचप्रमाणे ज्या नागरिकांना व्यवसाय होता व्यापार होता त्यांचा व्यापार लॉकडाऊनच्या काळामध्ये ठप्प झाला आणि त्यामुळे त्यांना पुढे जगायचं कसं अशा प्रकारचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता त्यामुळेच ते नागरिक खूप चिंताग्रस्त झाले होते कारण त्यांना रोजगार मिळत नव्हता तर अशाच लोकांसाठी नवीन रोजगार कशा पद्धतीने निर्माण करावा यावर सरकार देखील वेळोवेळी प्रयत्न करते आणि तेच प्रयत्न करत सरकारने अनेक साऱ्या योजना बनवल्या आणि त्यापैकीच एक योजना आहे ती म्हणजे free silai machine yojna मोफत शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत शिलाई मशीन दिली जाते 
















मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश 

मित्रांनो या योजनेतून घरकाम करणाऱ्या महिलांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचा स्वतःचा एक रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने सुरू केलेली ही योजना आहे या योजनेमधून जी काही शिलाई मशीन मिळणार आहे त्या शिलाई मशीन वर शिलाई काम करून ती महिला आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह सहज पद्धतीने करू शकते आणि त्यामुळेच ही योजना बनवलेली आहे 

मित्रांनो ही योजना सन 2019 मध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत देशांमध्ये जवळपास 50 हजार शिलाई मशीन महिलांना वाटण्याचा या योजनेचा हेतू आहे 













मोफत शिलाई मशीन पात्रता 

मित्रांनो या योजनेमध्ये काही पात्रता ठरवलेले आहेत त्या पात्रतेमध्ये अर्ज करणारी महिला बसत असेल तर केवळ त्याच महिलांना या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे

१. महिलेकडे आपण पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत याचा दाखला पाहिजे 
२. महिलेचे वय 20 च्या पुढे व 40 च्या आत मध्ये असले पाहिजे
३. अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांच्या आत मध्ये पाहिजे 


मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये

 सहभागी होण्यासाठी लागणारी

 महत्त्वाची कागदपत्रे



मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलेकडे खाली दिलेले कागदपत्र हवे आहेत 
१) आपण पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे नागरिक असल्याचा दाखला
२) अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड
३) अर्ज करणाऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो
४) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला 
४) जातीचे प्रमाणपत्र 
५) बँक पासबुक झेरॉक्स
६) सिलाई काम येत असल्याचे प्रमाणपत्र
७) आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर 




मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये

 अर्ज कसा करावा


मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुम्ही ग्रामीण भागामधील असाल किंवा शहरी भागामधील असाल तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये किंवा नगरपंचायत मध्ये महिला व बालकल्याण विभागांमध्ये जायचे तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे अर्ज संपूर्ण भरल्यानंतर सर्व कागदपत्रांसह तो अर्ज तुम्हाला त्या विभागांमध्ये परत द्यायचाय