Ladaki Bahin Yojana Update
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ज्या बातमीमुळे काही महिलांचे लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळालेले पैसे सरकारतर्फे वसूल केले जाऊ शकतात ती नेमके बातमी काय आहे तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात
मित्रांनो बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता व तसेच अपात्रतेचे निकष बरोबर वाचलेले नाही किंवा वाचलेले असून सुद्धा काही महिलांनी एडिट करून फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांना पैसे देखील मिळालेले आहेत अशा बोगस महिलांचे फॉर्म हे परत एकदा रिचेकिंग केले जातात त्यामधील एक महत्त्वाची अट ती म्हणजे वयाचे 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरतात परंतु बऱ्याचशा 21 वर्षाच्या खालच्या महिलांनी देखील व तसेच 65 वर्षाच्या वरील वयाच्या महिलांनी देखील या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे
यासोबतच संजय गांधी निराधार योजना किंवा इतर केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजना अंतर्गत ज्या महिलांना दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना एवढे मानधन मिळत असेल तर या महिला या योजनेतून अपात्र ठरते अशा प्रकारची एक अट देखील या योजनेमध्ये ठेवलेली होती परंतु अशा महिलांनी देखील फॉर्म भरलेले आहेत
0 Comments