Soyabin Kapus Anudan Kadhi Milnar
शेतकरी मित्रांनो या वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना Soyabin Kapus Anudan सोयाबीन व कापूस या पिकांसाठी हेक्टरी 5000 रु देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हे ५ हजार रुपये नेमके कधी मिळणार आहेत या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात
Soyabin Kapus Arthsahayy
मित्रांनो पाठीमागच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना हवे तेवढे उत्पन्न झाले नाही या सोबतच शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस पिकाला हवा तेवढा भाव मिळाला नाही त्यामुळेच २०२३ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपिकांची इ पिक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ५ हजार रुपये व कापूस पिकासाठी हेक्टरी ५ हजार रुपये अशी मदत दिली जाणार आहे
सोयाबीन कापूस अनुदान कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागे सांगितले होते कि ३१ ऑगस्ट पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊ, पण ते आले नाही त्या नंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी घोषणा केली १० सप्टेंबर पासून आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देऊ पण अजून देखील शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. पण काळजी करू नका कारण महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हे अनुदान कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर केली आहे.
0 Comments