Nuksan Bharpai 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे ती म्हणजे आता या शेतकऱ्यांनी जवळपास 22 हजार रुपये मदत सरकार तर्फे दिली जाण्याची शक्यता आहे तरीही मदत नेमकी कशी मिळणार आहे व ही नेमकी बातमी काय आहे सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात
या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
शेतकरी मित्रांनो या वर्षी संपर्क महाराष्ट्र मध्ये पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि याच मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत सरकारतर्फे शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावे अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे पाठीमागच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारने 16 जिल्ह्यातील जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता
त्यानंतर परत दहा नोव्हेंबर 2023 रोजी परत एक शासन निर्णय निर्गमित करून या 40 तालुक्यांमध्ये अतिरिक्त देखील जवळपास 1000 20 मंडळांमध्ये त्यांनी दुष्काळ जाहीर केला पण त्या जीआर मध्ये आम्ही नुकसान भरपाई देऊ अशा प्रकारचा कसलाही उल्लेख दिला नव्हता तर मग ही मदत नेमकी कशा पद्धतीने दिली जाणार आहे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे
तर मित्रांनो ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसापूर्वी पोस्ट अपलोड करत एक माहिती दिलेली आहे ती म्हणजे बहुवार्षिक पिकांसाठी जवळपास 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाऊ शकते तर मित्रांनो मग ही मदत खरच मिळणार का तुमची प्रतिक्रिया ही कमेंट मध्ये नक्की लिहा आणि या संदर्भात आलेल्या नवनवीन बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा
0 Comments