Pm Kisan Next Instalment Marathi

Pm Kisan Next Instalment Marathi 

नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आता नवनवीन प्रकारच्या योजना आखायला सुरुवात केलेली आहे आणि त्यापैकीच एक महत्त्वाचे असे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांना शासनातर्फे काहीतरी मदत मिळावे या अनुषंगाने सुरू केलेली योजना म्हणजेच Pm Kisan Yojana या पी एम किसान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी जवळपास सहा हजार रुपये अनुदान दिले जाते म्हणजेच मित्रांनो वर्षांमध्ये दोन प्रति दोन असे दोन दोन हजार रुपयांचे हप्ते वर्षांमध्ये तीन वेळेस दिले जातात आणि त्यामुळेच ही एक योजना शेतकऱ्यांसाठी खूप चांगली मानली जाते 


पुढील हप्त्याचे 2 हजार रुपये यांना मिळणार नाही 

मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्यातील काही लोकांना पैसे येत देखील होते परंतु आता त्यांचे दोन दोन हजार रुपयांचे हप्ते बंद झालेले आहेत तर त्या पाठीमागचे कारण आहे ते म्हणजे केंद्र सरकारने या योजनेमध्ये टाकलेल्या नवीन अटी मित्रांनो तुम्ही जर या तिन्हीही अटीमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला येणारा पुढील दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर त्या अटी कोणत्या आहेत ते देखील आपण बघूयात

1) शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत आपली इकेवायसी करणे बंधनकारक असणार आहे 
2) शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत म्हणजेच पीएम किसान योजनेच्या पोर्टल वरती तुमचे भूमी अभिलेख नोंदणी व्हेरिफाय असणे आवश्यक आहे 
3) शेतकऱ्यांच्या आधार एमपीसीआय म्हणजेच डीबीटी ट्रांजेक्शन साठी आपल्या आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे 


मित्रांनो वर सांगितलेल्या तीनही अटींमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला येणारा पुढील दोन हजार रुपयांचा हप्ता नक्की भेटेल तर तो हप्ता नेमका कधी मिळणार याची देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊयात 


पुढील 2 हजार कधी मिळणार?

मित्रांनो काही मीडिया पत्रकारांच्या मते व सूत्रांच्या माहितीनुसार येणारा पुढील दोन हजार रुपयांचा पंधरावा हप्ता म्हणजेच पीएम किसान योजना अंतर्गत दिला जाणारा पुढील हप्ता हा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल अशा प्रकारचा एक अंदाज मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वर्तवला जात आहे त्यामुळे हीच एक महत्त्वाची बातमी होती जी की तुम्हाला नक्की आवडले असेल मित्रांनो अशाच शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा