Namo Shetkari 1St Instalment
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे नवीन योजना म्हणजेच नमो शेतकरी महाजन्म निधी या योजना अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जाणार अशा प्रकारची घोषणा पाठीमागे राज्य सरकारने केली होती परंतु या योजनेचे अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसताना आपल्याला दिसत आहे कारण बऱ्याच दिवसापासून या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता अजूनही पेंडिंग आहे
पण मित्रांनो आता अशातच एक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेले आहे ती म्हणजे आता हा 2000 रुपयांचा पहिला हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याचीच तारीख समोर आलेली आहे तर ती तारीख नक्की किती असणार आहे व तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे का याचीच माहिती जाणून घेऊयात त्यासाठी ही माहिती संपूर्ण नक्की वाचा
नमो शेतकरी सन्मान योजना पहिला हप्ता
शेतकरी मित्रांनो दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र मधील शिर्डी मध्ये एका कार्यक्रमा दरम्यान आगमन होणार आहे तर याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकार नमो शेतकरी महा सन्माननिधी या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे कारण या योजनेतील पहिल्या हप्त्यासाठी जवळपास 1720 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सरकारने पाठीमागेच मंजूर केलेले आहेत व याचा एक जीआर देखील आपण नक्की बघितलेला असेल त्यामुळे लवकरच या योजनेचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे
हप्ता कोणाला मिळणार?
आता मित्रांनो या योजनेचा हप्ता नेमका कुणाला मिळणार तर मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेमध्ये पात्र असलेल्या व केवायसी व आधार एन पी सी आय बरोबर खाते योग्यरित्या लिंक असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच ज्या ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे दोन दोन हजार रुपयांच्या हप्ते मिळत असतात त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा देखील पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे
0 Comments