Namo Shetkari Sanman Yojana 1St instalment

Namo Shetkari Yojana 1St instalment 

शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे आता तुम्हाला दोन दोन हजार रुपयांचे तीन हप्ते आता राज्य सरकार देखील तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेतर्फे देणार आहे मग या योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही व कधीपर्यंत मिळू शकतो याची थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊयात. 


नमो शेतकरी सन्मान योजना पहिला हप्ता लवकरच 

मित्रांनो बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकरी हे नमो शेतकरी सन्माननीय या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण महाराष्ट्राच्या अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केल्यापासून जवळपास चार ते पाच महिने होत आहेत तरीदेखील या योजनेचे अंमलबजावणी वेळेवर झाली नसल्याकारणाने शेतकरी माता निराश होते पण आता अखेर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी खुशखबर दिलेली आहे 



ती म्हणजे काल दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी राज्य सरकारने या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या दोन हजार रुपयांचे वितरण करण्यासाठी जवळपास सतराशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि अशा प्रकारचा एक शासन निर्णय देखील सरकारने काढलेला आहे तो शासन निर्णय तुम्हाला खाली बघायला भेटेल